Home > W-फॅक्टर > मॉडेलचा एका मुख्यमंत्र्यांवर बलात्काराचा आरोप, महिला आयोगाची महाराष्ट्र पोलीसांना नोटीस

मॉडेलचा एका मुख्यमंत्र्यांवर बलात्काराचा आरोप, महिला आयोगाची महाराष्ट्र पोलीसांना नोटीस

या संदर्भात अधिक तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश महिला आयोगाने दिले आहेत..

मॉडेलचा एका मुख्यमंत्र्यांवर बलात्काराचा आरोप, महिला आयोगाची महाराष्ट्र पोलीसांना नोटीस
X

मुंबईतील एका मॉडेलने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या आरोपांची दखल घेत केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीसांना पत्र पाठवले असून या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात केंद्रीय महिला आयोगाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन माहिती देण्यात आली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांच्यावर मॉडलवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 2013 मध्ये मुंबईतील एका मॉडेलवर बलात्कार झाल्याचं सांगितलं जातंय. इतकंच नाही तर बलात्कारानंतर पीडितेच्या कुटुंबाला याबाबत सार्वजनिकपणे न बोलण्यासाठी धमक्याही देण्यात आल्याचा आरोप आहे.


Updated : 17 Dec 2020 3:00 PM GMT
Next Story
Share it
Top