Home > W-फॅक्टर > पहिल्या पत्नीशी 'तलाक' न घेता मुस्लीम पुरुष दुसरा 'निकाह' करु शकतो, पण..

पहिल्या पत्नीशी 'तलाक' न घेता मुस्लीम पुरुष दुसरा 'निकाह' करु शकतो, पण..

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा अजब निर्णय..

पहिल्या पत्नीशी तलाक न घेता मुस्लीम पुरुष दुसरा निकाह करु शकतो, पण..
X

"मुस्लीम पुरुष पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसर्याह महिलेशी लग्न करू शकतो, परंतु पण हाच नियम मुस्लीम महिलांसाठी लागू होत नाही" असं पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हा निर्णय देताना न्यायालयाने मुस्लीम विवाह कायदा 1939 चा संदरभ दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पंजाब हरियाणामधील एका मुस्लीम दांपत्याने दाखल केलेल्या याचिकेनुसार, त्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. पण ते घरच्यांना मान्य नसल्याने त्यांनी त्यांच्या मनाविरुध्द दुसऱ्याच व्यक्तीशी त्यांचा विवाह लावून दिला. पण या दोघांनी पुन्हा एकत्र येत 19 जानेवारी 2021 रोजी निकाहनाम्यानुसार विवाह केला.

आता मुलीच्या घरचांना हा विवाह मान्यनसल्याने त्यांच्यात वाद होत आहेत. शेवटी मुलीने आपल्या पहिल्या लग्नाविरोधात आणि सासरच्या मंडळींविरोधात याचिका दाखल केली. या याचिकेत मुलीने आम्ही दुसरं लग्न केलं असून आमच्या जीवाचं आणि स्वातंत्र्याचं संरक्षण केलं जावं अशी विनंती केली आहे.

न्यायालयाचा निर्णय काय?

या प्रकरणात आपली निरीक्षणे नोंदवताना न्यायमुर्ती अलका सरिन यांच्या एकल खंडपीठाने "याचिकाकर्त्या महिलेने यापुर्वी लग्न कधी आणि कोणाशी झालं यासंदर्भातील माहिती दिलेली नाही. या महिलेने मुस्लीम पर्सनल लॉ किंवा मुस्लीम विवाह कायदा १९३९ अंतर्गत आपल्या पतीला घटस्फोट दिला आहे की नाही यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. या महिलेचं पहिलं लग्न संपुष्टात आल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही त्यामुळे कायद्याच्या नजरेत या महिलेचा पहिला विवाह अजूनही ग्राह्य धरला जाईल." असं सांगीतलं आहे.

"पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता मुस्लीम पुरूष दुसरा विवाह करू शकतो, पण हाच नियम मुस्लीम महिलांसाठी लागू होत नाही. मुस्लीम महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून घटस्फोट घ्यावा लागतो. दुसऱ्यांदा लग्न करण्यापूर्वीच या महिलेला मुस्लीम पर्सनल लॉ किंवा मुस्लीम विवाह कायदा १९३९ अंतर्गत हा घटस्फोट घेता येतो. या प्रकरणामध्ये संबंधित महिला आणि तिच्या प्रियकराने केलेलं दुसरं लग्न हेच कायदेशीररित्या ग्राह्य धरलं जावं की नाही यासंदर्भात विचार करावा लागेल. कारण या महिलेने आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं आहे," असंही न्या. अलका यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या संदर्भातील वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस' ने दिलं आहे.

Updated : 9 Feb 2021 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top