Home > W-फॅक्टर > ‘माझ्या नावाच्या फेक अकाऊंटवर कुणीतरी यूट्यूबवर पॉर्न व्हिडीओ अपलोड करतंय’

‘माझ्या नावाच्या फेक अकाऊंटवर कुणीतरी यूट्यूबवर पॉर्न व्हिडीओ अपलोड करतंय’

‘माझ्या नावाच्या फेक अकाऊंटवर कुणीतरी यूट्यूबवर पॉर्न व्हिडीओ अपलोड करतंय’
X

चाहत्यांनी बॉलिवूड कलाकारांचे फेक अकाऊंट बनवल्याच्या अनेक घटना घडतात. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री कोयना मित्रासोबत घडला आहे. याबाबत कोयनाने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. या ट्वीटमध्ये तीने इन्स्टाग्राम आणि यूट्यूबच्या फेक अकाऊंटचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

यूट्यूबवर अभिनेत्री कोयना मित्राच्या नावाने एक फेक अकाऊंट बनवण्यात आले आहे. या अकाऊंटमधून अनेक पॉर्न व्हिडीओ अपलोड केले असल्याचं कोयनाने म्हटलं आहे. ‘‘तुम्हाला वाटते हे फॅनक्लब आहे? जे माझ्या नावाने असे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत आहे. हे अकाऊंट माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा हे अकाऊंट पाहा. हा गुन्हा नाही तर काय आहे?’ अशा शब्दात तिने ट्वीटरवर आपला संताप व्यक्त केला. या विरोधात सायबर क्राइमकडे तक्रार केली असून ‘माझ्या नावाने कोणाची फसवणूक तर झाली नाही ना हे देखील एकदा पाहावं’ असं कोयनाने आपल्या तक्रारित म्हटलं आहे.

https://twitter.com/koenamitra/status/1283935812720095233

https://twitter.com/koenamitra/status/1283937874006532096

Updated : 19 July 2020 10:16 AM GMT
Next Story
Share it
Top