Home > W-फॅक्टर > जो बायडन यांच्या मंत्री मंडळात भारतीय वंशाच्या महिलांचा बोलबाला!

जो बायडन यांच्या मंत्री मंडळात भारतीय वंशाच्या महिलांचा बोलबाला!

जो बायडन यांच्या मंत्री मंडळात भारतीय वंशाच्या महिलांचा बोलबाला!
X

येत्या २० जानेवारीला अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा शपथ विधी पार पडणार आहे. त्या आधी भारतासाठी एक चांगली बातमी आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदावर जो बायडन बुधवारी २० जानेवारीला विराजमान होतील. पण त्या आधीच बायडन यांनी भारतीयांना एक गोड बातमी दिली आहे. बायडन यांच्या मंत्री मंडळात तब्बल २० भारतीय वंशाच्या नारिकांचा सामावेश होणार आहे. विशेष म्हणजे या २० नागरिकांमध्ये सर्वात जास्त १३ महिला अधिकारी आणि मंत्र्यांचा सामावेश आहे.

या १३ ही महिला अधिकारी, मंत्र्यांना थेट व्हाईट हाऊस मधून महत्वाच्या हुद्यांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. एकूण २० भारतीय अधिकारी, मंत्र्यांपैकी १७ जण हे व्हाईट हाऊसच्या मुख्य पदांवर काम करणार आहेत. अमेरिकेच्या संसदीय इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीयांना मंत्री मंडळात स्थान देण्यात आलं आहे.

बुधवारी बायडन हे अमेरिकेच्या ४६ साव्या राष्ट्रध्यक्ष पदाची शपथ घेतील. तर भारतीय वंशाच्या असणाऱ्या कमला हैरीस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील. भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक क्षण असणार आहे. भारतीय महिलांनी अमेरिकेत स्थापन केलेलं त्यांच अस्तित्व आणि भारतीय स्त्री शक्ती साता समुद्रापारही कमी नाही हेच दिसून येत आहे.

बायडन यांच्या मंत्री मंडळात इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीयांचा सामावेश होणार असल्याने ही भारतासाठी ही गौरवास्पद बाब आहे. तसेच यामुळे अमेरिका आणि भारताचे संबंध बायडन यांच्या कार्यकाळात अत्यंत दृढ होतील, तसेच दोन्ही देशांच्यात अनेक महत्वपूर्ण करार होऊ शकतात.

Updated : 19 Jan 2021 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top