Home > W-फॅक्टर > ‘मैं कोरोना हू, बुलाता हू, मगर आने का नहीं’ महिला सरपंचाची भन्नाट शक्कल

‘मैं कोरोना हू, बुलाता हू, मगर आने का नहीं’ महिला सरपंचाची भन्नाट शक्कल

‘मैं कोरोना हू, बुलाता हू, मगर आने का नहीं’ महिला सरपंचाची भन्नाट शक्कल
X

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मधील गंवढाळा गट ग्रामपंचायतच्या सरपंच ताई जाधव व उपसरपंच अल्काबाई खरात या रणरागिणी गांवाला कोरोनापासून सुरक्षीत ठेवण्यासाठी अफलातुन शक्कल लढवत आहेत.

या दोघिंनी बुजगावणे सायकल वर बसवुन ‘मै कोरोना हु, बुलाता हूं, मगर पास आने का नही!’ असा संदेश देत गावात जनजागृती करत आहेत. काही महिन्यांपुर्वी सोशल मीडियावर ‘बुलाती है,मगर जाने का नही, या गाण्याचा ट्रेंड सुरु होता. तोच ट्रेंड उचलत या महिलांनी बुजगावण्यावर संदेश देत लोंकाना विनाकारण घराबाहेर न फिरण्याचे आवाहन करत आहेत.

‘मैं कोरोना हू, बुलाता हू, मगर आने का नहीं’ महिलांहा हा संदेश परिसरातील नागरिकांचा चर्चेचा विषय बनला आहे.

https://youtu.be/3h2Z2btZwrc

Updated : 17 July 2020 2:22 AM GMT
Next Story
Share it
Top