Home > W-फॅक्टर > मृताच्या विर्यावर हक्क कुणाचा? न्यायालय म्हणतं..

मृताच्या विर्यावर हक्क कुणाचा? न्यायालय म्हणतं..

मृत व्यक्तीच्या वीर्यावर त्याच्या पत्नीचा अधिकार असावा की पित्याचा? असा प्रश्न कोलकाता उच्च न्यायालयासमोर दाखल झाला होता. कोलकाता न्यायालयाने या प्रकरणार दिलेल्या निर्णयाची सध्या चर्चा होतेय

मृताच्या विर्यावर हक्क कुणाचा? न्यायालय म्हणतं..
X

मृत पतीच्या विर्यावर फक्त त्याच्या पत्नीचाच हक्क असू शकतो. आई वडिल त्यावर दावा करू शकत नाही, असा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. वडिलांनी मुलाच्या शुक्राणूंचा ताबा मिळावा यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावत सुनेच्या बाजुने निर्णय दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मूळ पश्चिम बंगालची असलेल्या मृत व्यक्तिने दिल्ली विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळवली होती. तो थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त होता. दिल्लीत उपचार घेत असतानाच त्याने त्याचे शुक्राणू फ्रिज केले होते. त्यानंतर त्याने दिल्लीतीलच एका तरुणीशी लग्न केले. 2018 साली ते दोघे पश्चिम मिदनापूरला स्थायिक झाले. मात्र शिफ्टिंगच्या काही दिवसानंतरच सुनीलचा मृत्यू झाला.

त्यानंतर मृताच्या वडिलांनी 2019 मध्ये त्याचे शुक्राणू ज्या ठिकाणी ठेवले होते. त्या बँकेला संपर्क साधून ते शुक्राणू मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बँकेने ते शुक्राणू फक्त पत्नीलाच दिले जाऊ शकतात असे सांगतिले. त्यामुळे वडिलांनी सुनेशी संपर्क साधत ते स्पर्म मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सुनेने देखील नकार दिला. त्यामुळे त्या वडिलांनी सुनेविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

मृताच्या पित्यानं मार्च २०२० मध्ये एक याचिका दाखल केली होती. आपल्या मुलाचे वीर्य दिल्लीच्या स्पर्म बँकेत सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. आपल्याला हे वीर्य बँकेतून काढण्याचा अधिकार दिला जावा. असं झाले नाही तर कराराच्या निश्चित वेळेनंतर हे वीर्य बिनकामाचे ठरतील, असंही पित्याचं म्हणणं होतं.

न्यायालयाचा निर्णय..

न्यायालयात या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सब्यसाची भट्टाचार्य यांच्या पीठानं, याचिकाकर्त्यांकडे या पद्धतीनं परवानगी घेण्याचा कोणताही मूलभूत अधिकार नसल्याचं स्पष्ट केलं. वीर्य दिल्लीच्या स्पर्म बँकेत स्टोअर करण्यात आले होते. आता त्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यानंतर या वीर्यावर पहिला अधिकार त्याच्या पत्नीचाच आहे, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

Updated : 23 Jan 2021 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top