ठाकरे सरकार जागे व्हा - लॉकडाऊन लावलंच तर महिलांसाठी एवढं कराच
लॉकडाऊन लावावा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री दोन दिवसात घेणार आहेत. लॉकडाऊनचा एक मोठा अनुभव या आधी सर्वांनीच घेतलाय. याच लॉकडाऊनमुळे अनेक महिलांचा रोजगार गेला. त्यामुळे सरकार दुसऱ्या लॉकडाऊनच्या तयारीत असेल तर आधी त्यांनी आमच्या पाच मागण्या मान्य कराव्यत..
 X
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. पण लॉकडाऊनला राज्यभरातील सामान्य नागरिक, छोटे-मोठे उद्योजक यांनी मोठा विरोध केला आहे. पण, मुख्यमंत्री लॉकडाऊनच्या भूमिकेवर ठाम आहेत.
लॉकडाऊनचा एक मोठा अनुभव या आधी सर्वांनीच घेतलाय. याच लॉकडाउनमुळे अनेक महिलांचा रोजगार गेला. आणि याला कारण ठरली अपुरी दळणवळणाची व्यवस्था. मुंबई सारख्या ठिकाणी अनेक महिला ट्रेनने प्रवास करतात. तर काही रिक्षा आणि बेस्ट गाड्यांचा वापर करतात. फार कमी महिलांकडे स्वत:च्या गाड्या आहेत. आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांना चालवता येतातच असं नाहीय.
लॉकडाउनमुळे ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी या सर्वच दळणवळणाच्या सुवीधा बंद असल्याने अनेक महिलांना कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नव्हतं. या एकाच कारणामुळं अनेक कंपन्यांनी महिलांना कामावरुन काढलं. सरकारच्या या आडमुठेपणामुळे अनेकांचा उपासमारिने मृत्यु झाला.
त्यामुळे सरकार दुसऱ्या लॉकडाउनच्या तयारीत असेल तर आधी त्यांनी आमच्या पाच मागण्या मान्य कराव्यत..
आमच्या पाच मागण्या..
1) महिलांसाठी विशेष आर्थीक पॅकेज जाहिर करा
2) दळणवळणासाठी महिलांना विशेष सवलत मिळालीच पाहिजे
3) महिलांना ड्रायव्हिंगचं मोफत ट्रेनींग द्या
4) लॉकडाउनमध्ये ज्या महिलांकडे परवाना नसेल त्यांना विशेष परवाना द्या
5) महिलांना ट्रॅव्हलींगच्या विशेष सुवीधा उपलब्ध करुन द्या
लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाहीये. काही मुद्द्यांवर सरकारने तातडीने कृती केली तर बरेच प्रश्न सुटू शकतात.















