Home > W-फॅक्टर > farmers protest : शेतकऱ्यांचा गोदी मीडियाला तडाखा, महिला पत्रकारांना करावं लागतंय वार्तांकन

farmers protest : शेतकऱ्यांचा गोदी मीडियाला तडाखा, महिला पत्रकारांना करावं लागतंय वार्तांकन

शेतकऱ्यांचा गोदी मीडियाला तडाखा बसला असून महिला पत्रकारांना वार्तांकन करावं लागत आहे. त्यामुळे आपल्या चुकीच्या वार्ताकनामुळे लोकांचा विश्वास गमावलेले हे चॅनल्स महिला पत्रकारांचा वापर करुन घेतायत का? असा प्रश्न उपस्थित होतो

farmers protest : शेतकऱ्यांचा गोदी मीडियाला तडाखा, महिला पत्रकारांना करावं लागतंय वार्तांकन
X

गेल्या काही वर्षात भारतीय माध्यमांची प्रतिमा जनमाणसात मलिन झाली आहे. त्यामुळे अनेक भारतीय माध्यमांना जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागतं आहे. जगभरात देखील यामुळे मुख्यप्रवाहातील अनेक माध्यमांची विश्वासार्हतेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले जात आहे.

दिल्लीच्या विविध सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये अनेक माध्यमांना तोंड लपवून पळण्याची वेळ आली आहे. काही माध्यमं शेतकरी आंदोलनाचं योग्य वार्तांकन करत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागतं आहे.

यावर उपाय म्हणून माध्यमांनी चॅनलची ओळख असलेलं बूम स्टीकर काढून अथवा लेपल माईकचा वापर करण्यास सुरुवात केली, मात्र तरीही शेतकऱ्यांचा विरोध थांबताना दिसत नाही. हे माध्यमांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पंजाबची पार्श्वभूमी असलेली किंवा पंजाबी भाषा येत असलेल्या प्रतिनिधींना वार्तांकनासाठी पाठवले. हे करुनही शेतकऱ्यांचा रोष काही थांबलेला दिसत नाही. ही बाब लक्षात घेता आता महिला प्रतिनिधींना वार्तांकनासाठी आंदोलनाच्या मैदानात धाडले आहे.

अनेक राष्ट्रीय माध्यमांचं वार्तांकन करण्यासाठी महिला पत्रकारांना पाठवण्यात आलं आहे. महिला पत्रकार असल्यामुळे शेतक-यांचा विरोध कमी झाला असला तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याचं चित्र आहे.

एकंदरित शेतकऱ्यांच्या मनामध्ये माध्यमांबद्दलची प्रतिमा मलिन झाली असल्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Updated : 30 Dec 2020 7:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top