Home > W-फॅक्टर > Bharat Bandh : गाण्यातून शेतकऱ्यांना पाठिंबा देणारी पंजाबदी कुडी

Bharat Bandh : गाण्यातून शेतकऱ्यांना पाठिंबा देणारी पंजाबदी कुडी

Bharat Bandh : गाण्यातून शेतकऱ्यांना पाठिंबा देणारी पंजाबदी कुडी
X

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातून शेतकरी दिल्लीत जमा झाले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली या बंदला देश भरातून लोकांनी प्रतिसाद दिला. दिल्लीतील या शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी विद्यार्थी देखील आपला 'डफ' घेऊन मैदानात उतरुन गाण्याच्या माध्यमातून वातावरणात जोश निर्माण केला जातोय.

"प्रत्येत शेतकऱ्याला त्याची जमीन आई समान असते त्यामुळे हे शेतकरी शेतीसाठी नाही तर आपल्या आईसाठी लढत आहेत. त्यामुळे इथे लोक शेवटच्या श्वासापर्यंत लढतील." अशी प्रतिक्रीया दिल्ली आंदोलनात सहभागी झालेल्या अमनदीप या पंजाबी तरुणीने दिली आहे.

पुढे बोलताना अमनदीप म्हणाल्या की, "पंजाबला संघर्षाचा वारसा आहे. आम्ही जन्माला येतोच मुळात संघर्षासाठी त्यामुळेच आम्ही तरुण विद्यार्थी आज मोठ्या प्रमाणात दिल्लीत एकत्र आलो आहोत. इथं आम्ही गाणी म्हणतोय ज्याने वातावरणात एक जोश निर्माण होतो."

या तरुणांशी संवाद सादलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी..


Updated : 8 Dec 2020 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top