Home > W-फॅक्टर > खेळाचं मैदान गाजवून सुख सिंधु उतरल्या शेतक-यांसाठी आंदोलनाच्या मैदानात

खेळाचं मैदान गाजवून सुख सिंधु उतरल्या शेतक-यांसाठी आंदोलनाच्या मैदानात

खेळाचं मैदान गाजवून सुख सिंधु उतरल्या शेतक-यांसाठी आंदोलनाच्या मैदानात
X

समाजातील कोणतीही क्रांती महिलांशिवाय पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे दिल्लीच्या सीमारेषेवर पंजाब हरियाणातील शेतक-यांशिवाय सरकारविरोधात छेडलेलं जनआंदोलन हे महिलांशिवाय अपूर्ण आहे.

कृषी विधेयकाविरोधात घरातील पुरुष मंडळी मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरली असताना घरातील महिला वर्ग शेतातल्या कामांसह घरातल्या जबाबदा-या पार पाडत आहेत. हे ही एक प्रकारे आंदोलनात सहभागी होण्यासारखं असल्याचे म्हणायला हरकत नाही.

या आंदोलनात अनेक महिला सामील झाल्या असून सिंघू बाॅर्डरवर लक्ष वेधून घेणा-या Athletics champion सुख सिंधू जागतिक पातळीवर खेळाचं मैदान गाजवून आता शेतकर्यांसाठी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

शेतक-याबाबत त्यांना नेमकं काय वाटत?

सरकारची भूमिका सामान्यांप्रती कशी वाटते? त्याचप्रमाणे एक खेळाडू म्हणून भारतीय मीडियाकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन कसा आहे? यासंदर्भात मॅक्स वूमनने त्यांच्या सोबत चर्चा केली असता त्यांच्या मते,

माझे हे किसान बांधव स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत. परंतु "मोदी सरकार मन की बात करत शेतकऱ्यांची मन की बात ऐकत नाहीये."

कोणताही कायदा बनवताना त्या कायद्याअंतर्गत येणार्या सामान्य लोकांचे मत सुद्धा घेणे गरजेचे आहे. आणि त्यानंतरच त्या कायद्याला मंजुरी द्यावी.

असं आम्हाला वाटतं.

आमची लढाई नरेंद्र मोदी यांच्याशी नाही तर त्यांनी बनवलेल्या शासनासोबत आहे. कोणतेही कायदे बनवताना सामान्य माणसाला त्रास होणार नाही या पद्धतीने कायदे बनवावेत.

मी एक खेळाडू आहे. त्यामुळे मला सुद्धा खेळाडू असल्याने ज्या फॅसिलिटीज मिळायला हव्यात त्या मिळत नाहीत.

मोदींनी सगळ्यांचीच वाट लावली आहे.

"आज की नारी बहुत संघर्षशील हो रही है"

ती स्वतःच्या हक्कांसाठी लढू शकते. ती प्रत्येक कायदा समजू शकते. आणि तीच नारी देशातील पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार या सगळ्यांना मत देऊन निवडून आणत असते. मात्र निवडून आल्यानंतर हेच आमदार-खासदार आपल्या मतदात्याला विसरतात.

त्यामुळे पुढच्या वेळेस मोदी सरकार येणार नाही याची काळजी आम्ही घेऊ.

मोदी आपल्या वक्तव्यावर ठाम राहत नाहीत. पण माझे शेतकरी बांधव सुद्धा मागे हटणार नाहीत. आम्ही आमचा अधिकार मिळवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्हाला दिल्लीला जावे लागले तरी बेहत्तर...

"गोदी मीडियामुळे सत्य अंधारात"

मोदीजींनी काही माध्यमं विकत घेतली आहे. त्यामुळे लोकांपर्यंत सत्य पोहचत नाही. मोदींची प्रशंसा करणा-या गोदी मीडियाशी आम्ही बोलतच नाही. त्यांना आम्ही बायकॅाट केलं आहे.

सुखसिंधू या एक खेळाडू म्हणून या आंदोलनात ताकदीनिशी सामील झाल्या असून त्यांनी देशातल्या समस्यांवर मॅक्स वूमनशी केलेली बातचीत नक्की पाहा

Updated : 12 Dec 2020 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top