Home > W-फॅक्टर > गुजरातच्या या महिलेने न्यायमुर्ती पुष्पा गनेडीवाल यांना पाठवले चक्क 150 कंडोम

गुजरातच्या या महिलेने न्यायमुर्ती पुष्पा गनेडीवाल यांना पाठवले चक्क 150 कंडोम

गुजरातच्या या महिलेने न्यायमुर्ती पुष्पा गनेडीवाल यांना पाठवले चक्क 150 कंडोम
X

विवादीत निकाल देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठाच्या न्यायमुर्ती पुष्पा गनेडीवाल तुम्हाला माहितीच असतील. या न्यायमुर्ती आता पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आणि याला कारण आहे गुजरातची एक महिला. गुजरातमधील एका महिलेने न्यायाधीश पुष्पा गनेडीवाल यांच्या कार्यालयात दीडशे कंडोमची पाकिटे पाठवले आहेत.

पुष्पा गनेडीवाल यांनी दोन वादग्रस्त निर्णय दिले होते. त्यातील एकामध्ये 'आरोपीचा अल्पवयीन मुला-मुलींच्या त्वचेचा त्वचेशी संपर्क झाला नसेल तर तो लैंगिक अत्याचार होत नाही.' असे म्हटले गेले होते. गनेडीवाल यांच्या या निर्णयांविरोधात गुजरातच्या या महिलेने कंडोमची पाकिटे पाठवल्याचं बोललं जात आहे.

कंडोम पाठवणाऱ्या महिलेचे नाव देवश्री त्रिवेदी असून त्या गुजरातमधील अहमदाबादच्या रहिवासी आहेत. त्या स्वत: ला राजकीय विश्लेषक म्हणतात. एवढच नाही तर त्यांचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे.

एका वृत्त समुहाला दिलेल्या मुलाखतीत देवश्री म्हणाल्या की, "पुष्पा गनेडीवाल यांनी आरोपीचा अल्पवयीन मुला-मुलींच्या त्वचेचा त्वचेशी संपर्क झाला नसेल तर तो लैंगिक अत्याचार होत नाही असं आपल्या निर्णयात म्हटलं होतं. आणि कंडोम हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. कंडोम प्रतीक म्हणून पाठविले आहे.

या 150 कंडोम सोबत देवश्री यांनी न्यायमुर्ती पुष्पा यांना एक पत्र देखील दिलं आहे. या पत्रात त्यांनी "पुष्पा गेंडीवाला यांना लवकरात लवकर त्यांच्या पदावरून निलंबित करावे" अशी विनंती केली आहे.

याबाबतचे वृत्त times of india वृत्त समुहाने दिलं आहे.

Updated : 18 Feb 2021 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top