धनंजय मुंडे आणखी गोत्यात, एकीतुन सुटले दुसरीत अडकले
मंत्री धनंजय मुंडे यांनी ज्या महिले सोबत आपले संबंध असल्याचे मान्य केले त्याच महिलेचा धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, मुंडेंनी या महिलेपासून आपल्याला दोन मुलं असल्याचंही मान्य केलं होतं..
X
रेणू शर्मा या महिलेने समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेला बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांना थोडा दिलासा मिळाला होता. पण धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत सबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा यांनीच आता मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली आहे. सोशल मिडियावर तक्रारीचे पत्र व्हायरल झाल्यानंतर आता करुण शर्मा यांनी बातमी सध्या न चालवण्याची विनंती केली आहे. करुणा शर्मा या रेणू शर्मा यांच्या बहिण आहेत. करुणा शर्मा यांच्यासोबत आपले संबंध असून त्यांच्यापासून दोन मुले झाल्याची कबुली धनंजय मुंडे यांनी याआधीच दिली आहे. तसेच करुणा शर्मा यांची मुलं आपल्यासोबतच राहत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
त्याच करूणा शर्मा यांनी आता मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यांपासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. आपल्याला मुलांना भेटू दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.
यासंदर्भात आम्ही करुणा शर्मा यांना संपर्क साधला, तेव्हा त्यांचे वकील श्रीकांत मिश्रा यांनी बातमी २० फेब्रुवारीपर्यंत न चालवण्याची विनंती केली.
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. पण त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपले रेणू शर्माची बहिण करुणा शर्मा यांच्यासोबत संबंध असून त्याची माहिती आपल्या कुटुंबालासुदधा आहे असे कबूल केले होते. तसेच रेणू शर्मा यांचे सर्व आरोप फेटाळलेसुद्धा होते. त्यानंतर रेणू शर्मा यांनी त्रास दिल्याच्या तक्रारी इतर काही नेत्यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांच्यावर तूर्तास कारवाई न करण्याचा निर्णय घेतला होता.