Home > व्हिडीओ > Bharat Bandh : शेतकऱ्यांच्या समर्थनात मुंबईतील महिला उतरल्या रस्त्यावर

Bharat Bandh : शेतकऱ्यांच्या समर्थनात मुंबईतील महिला उतरल्या रस्त्यावर

Bharat Bandh : शेतकऱ्यांच्या समर्थनात मुंबईतील महिला उतरल्या रस्त्यावर
X

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटनांसह सत्ताधारी राजकीय पक्ष देखील सहभागी झाले आहेत. बंदला पहाटेपासूनच सुरुवात झाली आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी आता मुंबईतील महिलाही रस्त्यावर उरल्या आहेत. नवी मुंबई ते मरिन ड्राइव्ह अशी कार रॅली काढण्यात येणार आहे.

"शेतकऱ्यांच्या समर्थनात आणि उद्योजक, व्यापारी यांची गुलामी शेतकरी करु शकत नाही हे मोदी सरकारला सांगण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. हे सरकार लोकशाही विसरलंय आणि हिटलरशाही आणायच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी आता आम्ही मरिन ड्राइव्हला एकत्र येवु तिथं मानवी साखळी तयार करुन लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करु." असं या महिलांनी सांगीतलं.

या महिलांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी..Updated : 8 Dec 2020 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top