Home > व्हिडीओ > डॉ. बाबासाहेब नसते तर महिलांना मतदानाच्या हक्कासाठी लढा उभारावा लागला असता: मनिषा कायंदे

डॉ. बाबासाहेब नसते तर महिलांना मतदानाच्या हक्कासाठी लढा उभारावा लागला असता: मनिषा कायंदे

डॉ. बाबासाहेब नसते तर महिलांना मतदानाच्या हक्कासाठी लढा उभारावा लागला असता:  मनिषा कायंदे
X

आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० जयंती पूर्ण जगभर साजरी केली जात आहे. मॅक्समहाराष्ट्र यंदांची जयंतीतून बाबासाहेबांचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील विविध घटकांशी चर्चा करत आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अथांग ज्ञानाचा आणि कतृत्वाचा सागर…बाबासाहेबांच्या कतृत्वाबाबत बोलताना मनिषा कायंदे सांगतात…
डॉ. बाबासाहेबांनी महिलांना मतदानाचा हक्क मिळवून दिला अन्यथा यासाठी इथल्या महिलांना आंदोलनं करावी लागली असती.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांबाबत केलेलं वक्तव्यच ते महिलांना एक व्यक्ती म्हणून पाहत असल्याची जाणीव होते. ते म्हणतात…

ज्या समाजात महिला शिक्षण घेतात तो समाज प्रगतीच्या मार्गावर जात असतो. त्यांचा हा विचार घेऊन डॉ. मनिषा कायंदे काम करत असल्याचं त्यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितलं.

बाबासाहेबांचं कार्य इतकं महान होतं की त्यांच्या एका निर्णयानं वर्षानुवर्ष इथल्या समाजात वेगळे मानले जाणारे स्त्री पुरूष समान झाले. त्यांना समान अधिकार मिळाले.

अन्य देशातील महिलांना मतदानाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करावी लागली. तसं काही भारतात झालं नाही. भारतातल्या महिलांना मतदानाच्या हक्कासाठी लढा उभारावा लागला नाही.

Updated : 13 April 2021 10:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top