Home > व्हिडीओ > 'ज्युनिअर मीराबाई'च्या व्हिडिओची सोशल मिडियावर होतेय चर्चा

'ज्युनिअर मीराबाई'च्या व्हिडिओची सोशल मिडियावर होतेय चर्चा

ज्युनिअर मीराबाईच्या व्हिडिओची सोशल मिडियावर होतेय चर्चा
X

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताला मीराबाई चानूने देशाला पहिला पदक मिळून दिले. त्यांनतर मीराबाईची देशभरात आणि सोशल मिडियावर मोठी चर्चा आहे. मात्र असं असताना सोशल मिडियावर आता आणखी एक ज्युनिअर मीराबाईची चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या ज्युनिअर मीराबाईच कौतुक खुद्द ऑलिम्पिकमध्ये पदक मिळून देणाऱ्या मीराबाई चानूने केलं आहे.

मीराबाईला एकूण २०२ किलो वजन उचलताना संपूर्ण जगाने पाहायले, पण आता अशीच एक ज्युनिअर मीराबाई वजन उचलतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाचव्हायरल होत आहे. ज्यावर लोकांनी सुद्धा मनसोक्तपणे सकारत्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला पाहून ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या मीराबाई चानू सुद्धा खुश झाल्या. त्यांनी ट्वीट करत 'खूप गोंडस, हे फक्त प्रेम असू शकते' अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या ट्वीटनंतर ज्युनिअर मीराबाईची आणखीच चर्चा वाढली असून, तिच्या व्हिडिओनो सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.

Updated : 27 July 2021 5:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top