Home > व्हिडीओ > "आज JCB फोडलाय उद्या नगरपालिका फोडू" स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिलेचा पालिकेला इशारा

"आज JCB फोडलाय उद्या नगरपालिका फोडू" स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिलेचा पालिकेला इशारा

आज JCB फोडलाय उद्या नगरपालिका फोडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिलेचा पालिकेला इशारा
X

बीड नगरपरिषदे विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला पदाधिकारी सारिका गायकवाड आक्रमक झाल्या आहेत. नाळवंडी परिसरात नगरपालिकेकडून शहरातील संपूर्ण कचरा आणून टाकण्यात येतोय. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीय, तर घाटे वस्तीवर जाण्यासाठी शेतकर्यां ना त्रास होत असल्यानं सदरील ठिकाणी कचरा टाकू नये. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जेसीबी वर चढून आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्वाभिमानीच्या महिला कार्यकर्त्या सारिका गायकवाड यांनी नगरपालिकेला जाब विचारून जेसीबीचा काचा फोडल्या आहेत.

बीड नगरपालिकेचे कचरा ठेकेदार अनेक वेळा सांगूनही नागरी वसाहतीत कचरा टाकत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. वारंवार सांगूनही हा प्रकार न थांबल्याने सारिका गायकवाडांचा पारा चढला. त्यांनी भररस्त्यातच जेसीबी अडवला. त्यानंतर जेसीबीवर चढून लाकडी दांडक्याने तोडफोड केली. हा प्रकार कॅमेरात कैद झाला.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.


Updated : 2020-10-24T18:18:11+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top