UGC विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतय – विद्यार्थी भारती
X
युजीसी गलिच्छ राजकारण करत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप विद्यार्थी भारती संघटनेनं केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात यूजीसी' विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे तर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत विद्यार्थी भारती संघटनेच्या अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी कोरोनाचे संकट असताना युजीसी गलिच्छ राजकारण खेळत असून विद्यार्थ्यांना बळी पाडत असल्याचा आरोप केला आहे.
“विद्यार्थ्यांच्या जीवाची त्यांना कोणतीच पर्वा नाही ,या काळात विद्यार्थी जर कोरोना बाधित झाले तर याला काय पर्याय आहे? याबाबत युजीसी काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. युजीसी ने परिक्षांबाबतचा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वटहुकूम जारी करत सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना पास करावं. जर याबाबत निर्णय घेतला नाही तर विद्यार्थी भारती तीव्र आंदोलन करेल.” असा इशारा मंजिरी धुरी यांनी दिला आहे.
https://youtu.be/r1vUV1q1acg