Home > व्हिडीओ > "साहेबांच्या जयंतीला मोठा कार्यक्रम न घेता फक्त रक्तदान शिबीरांचं आयोजन करा" – पंकजा मुंडे

"साहेबांच्या जयंतीला मोठा कार्यक्रम न घेता फक्त रक्तदान शिबीरांचं आयोजन करा" – पंकजा मुंडे

साहेबांच्या जयंतीला मोठा कार्यक्रम न घेता फक्त रक्तदान शिबीरांचं आयोजन करा – पंकजा मुंडे
X

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमीत्त यंदा गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम होणार नाही, "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी, सर्वांनी स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, साहेबांच्या जयंतीला मोठा कार्यक्रम न घेता फक्त रक्तदान शिबीरांचं आयोजन करा" असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

त्या म्हणाल्या की, "यंदा सर्व सामान्य जनता कोरोनाच्या संकटात सापडली आहे, अशा परिस्थितीत कोणालाही त्रास न होता वेगळ्या पद्धतीने 12 डिसेंबर हा दिवस साजरा करायचा आहे. मोठे नेते, मोठी सभा, गर्दी टाळायची आहे. मी स्वतः 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांनी गडावर दर्शन घ्यायचे आहे. महामारीच्या या संकटात सामाजिक उपयोगिता आणि आवश्यकता लक्षात घेऊन सर्वांनी 12 ते 15 डिसेंबर दरम्यान ठिकठिकाणी केवळ आणि केवळ रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, असल्याने मुंडे साहेबांच्या जन्मदिवशी असे समर्पित कार्यक्रम घ्यावेत व त्याचे फोटो आणि कार्यक्रमाचे वर्णन सोशल मिडियावर द्यावेत." असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.


Updated : 11 Dec 2020 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top