Home > व्हिडीओ > ‘आता प्रत्येक महिलेने दुर्गेचं रुप घेणं गरजेचं’- रुपाली पाटील ठोंबरे

‘आता प्रत्येक महिलेने दुर्गेचं रुप घेणं गरजेचं’- रुपाली पाटील ठोंबरे

‘आता प्रत्येक महिलेने दुर्गेचं रुप घेणं गरजेचं’- रुपाली पाटील ठोंबरे
X

कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा बलात्कारासह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून आरोपील अटक केली. यावर बोलताना पुण्याच्या मनसे जिल्हाध्यक्षा रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, ‘कुठली विकृती आहे ही? लाज कशी वाटत नाही यांना? ही विकृती महिलांना असुरक्षीत ठेवते.

माझी संपुर्ण महाराष्ट्रातील महिलांना विनंती आहे, अशा विकृतींना आपण जागीच ठेचलं पाहिजे. कराण नुसता निषेध तक्रारी होत रहातील पण ही विकृती संपवली पाहिजे. आणि ती आपण महिलाच चांगल्या पध्दतीने संपवू शकतो. पण त्यासाठी प्रत्येक महिलेने दुर्गेचं रुप घेणं अवश्यक आहे.’ असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

https://youtu.be/vCUndxkwAoA

Updated : 31 July 2020 1:26 AM GMT
Next Story
Share it
Top