Home > व्हिडीओ > व्हिडीओ: रुढी परंपरेला फाटा; आईच्या पार्थिवास मुलींनी दिला खांदा

व्हिडीओ: रुढी परंपरेला फाटा; आईच्या पार्थिवास मुलींनी दिला खांदा

आईस चार मुलींनीच खांदा दिला आणि पार्थिव स्मशानभूमीत नेल्यानंतर पाचव्या मुलीने मुखाग्नी देखील दिली

व्हिडीओ: रुढी परंपरेला फाटा; आईच्या पार्थिवास मुलींनी दिला खांदा
X

बीड: जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील जांब येथे पुरुष प्रधान रूढी परंपरांना मोडीत काढणारी अंत्ययात्रा पाहायला मिळाली. मुलगा नसल्याने आपल्या आईस चार मुलींनीच खांदा दिला आणि पार्थिव स्मशानभूमीत नेल्यानंतर पाचव्या मुलीने मुखाग्नी देखील दिली.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्याला खांदा देण्याचा आणि मुखाग्नी देण्याचा मान पुरुषांनाच असतो. मात्र शिरूर इथल्या जांब या गावात ही परंपरा सहा बहिणींनी मोडीत काढलीय.

जांब येथील लक्ष्मीबाई कांबळे यांचं गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाल. त्यांच्या पाश्चात त्यांच्या पाच मुली, जावई नातवंड असा परिवार आहे. लक्ष्मीबाईंना मुलगा नाही त्यामुळे त्यांच्या पार्थिवास भावकीतील व्यक्ती आणि जावई खांदा देण्यास पुढे सरसावले. मात्र, मुलींनी त्यास नकार दिला.

संपूर्ण आयुष्य आईने मायेची उब दिली. तिचे ऋण फेडणे शक्य नाही. मात्र तिच्या अंतिम प्रवासात तिच्या पार्थिवाला आपणच खांदा द्यावा, अशी इच्छा मुलीच्या मनात आली. आणि त्यांनी ती बोलून दाखवली. उपस्थित सग्य- सोयऱ्यांनी देखील रूढी परंपरेला फाटा देत याला संमती दर्शविली. त्यानंतर सुनीता केदार, विमल केदार, शशिकला केदार, आणि भीमाबाई मोरे या चार मुलींनी पार्थिवास खांदा दिला. तर मुखाग्नि देखील मुलीनीच दिला आहे.

Updated : 22 May 2021 4:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top