पालघर जिल्ह्यात होणारे बालमृत्यू आणि कुपोषण त्यातच हा कोरोना त्यामुळे पालघर जिल्ह्याकडे सरकारचं जरा जास्त लक्ष असल्याचं महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यापुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण, घरगुती हिंसाचार,मुले पळवण्याचे, पळून जाण्याचे प्रमाण, बालविवाह , कुमारिका अल्पवयीन माता,संरक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक,मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध सुविधा, याचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली.’ यशोमची ठाकूर यांनी सांगीतलं.
https://youtu.be/XDsbfSNlWQM
Updated : 22 July 2020 1:59 AM GMT
Next Story