Lockdown : या पुरुषाकडून तुम्ही धडा घ्या...
X
लॉकडाऊन असो किंवा अन्य कोणताही प्रसंग पोलिस म्हणजे ऑन ड्युटी चोविस तास. मग यात महिला पोलिसही कुठेच कमी नाहीत. दिवस असो वा रात्र, पोलिस ठाण्यात असो वा गस्तीवर असं कोणत्याही वेळी, कोणच्याही ठिकाणी महिला पोलिस कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, आपली जबाबदारी निभावत असताना याचं महिलांना संसार कसा चालवता असा प्रश्न विचारला जातो. बऱ्याचदा त्यांच्या पतीलाही विचारणा केली जाते.
सध्या सोशल मीडिय़ावर लॉकडाऊन मध्ये घरात कोण कोण काय करतायत यांचे व्हिडाओ पोस्ट केले जातायत. असाच एक व्हिडीओ साताऱ्याच्या एसपी तेजस्विनी सातपुते यांच्या पतीने आपला घरात वेळ कसा घालवत आहेत. हे दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
घरातील काम ही आपलीही जबाबदारी आहे असं मानुन जर पुरुष या पद्धतीने काम करत असतील. महिलांना त्यांची काम करण्यात हातभार लावत असतील तर तुम्हालाही यातुन धडा घ्यायला हवा... पाहा व्हिडीओ.
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/563211324300772/?t=51