Home > व्हिडीओ > लग्न नेमकं कशासाठी करतात? मुल, सेक्स, की चांगला जोडीदार....

लग्न नेमकं कशासाठी करतात? मुल, सेक्स, की चांगला जोडीदार....

लग्न नेमकं कशासाठी करतात? मुल, सेक्स, की चांगला जोडीदार....
X

लग्न म्हटलं की तरूणाईच्या मनातील एक कोपरा हळवा होतो. मनात प्रेमाची नवी पालवी फुटू लागते. कानावर मंगलाष्टका पडू लागतात. होणाऱ्या पत्नीविषयी स्वप्नं पडू लागतात. सगळीकडे आनंदी आनंद असतो. पण लग्नानंतर जबाबदारी देखील असते त्याचं देखील भान येतं. हे सगळं जरी असलं तरी एक प्रश्न कधी स्वतःला विचारलाय का? नेमकं लग्न का करतात? आम्ही विचारला स्वतःला नाही आजच्या तरूणाईला! त्यांना लग्नाबद्दल नेमकं काय वाटतं चला जाणून घेऊयात.

लग्न का करतात हा प्रश्न वेगवेगळ्या पिढीला विचारल्यावर वेगवेगळी कारणं मिळतील. आत्ताच्या तरूणाईला आम्ही हाच प्रश्न विचारल्यावर आम्हाला वेगवेगळी उत्तरं मिळाली. काहींनी वंश वाढवण्यासाठी लग्न केलं जातं तर काहींनी चांगला जोडीदार मिळावा म्हणून लग्न करतात तर काहींनी परंपरा असल्यामुळे लग्न केलं जातं अशी उत्तरं दिली.

मग त्यांना आम्ही मुल जन्माला घालण्यासाठी लग्न करतात का? असा प्रश्न विचारल्यावर काहींनी लग्न हे चांगला जोडीदार मिळावा म्हणून करावं असं उत्तर दिलं तर काहींनी वंश परंपरा वाढवणं हेदेखील एक कारण आहे तर काहींनी आयुष्य सोबत घालवण्यासाठी एक जोडीदार असावा म्हणून लग्न करावं अशी उत्तरं दिली.

मग आम्ही या तरूणांना लग्नानंतर जोडप्यावर बाळासाठी तगादा लावणं हे कितपत योग्य आहे असं विचारल्यावर काहींनी हे चुक असल्याचं म्हटलंय तर काहींनी हा निर्णय पुर्णतः त्या जोडप्याचा असल्याचं सांगितलं. तर काहींनी अंशतः हा प्रश्न बरोबर असुन २० टक्के घरच्यांच्या मताला आदर दिला पाहिजे आणि बाकी ८० टक्के जोडप्याने विचार करून निर्णय घेतला पाहिजे असं मत मांडलं आहे.

Updated : 18 May 2022 5:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top