राहुल देशपांडेंना मुलीने काय सुनावलं बघा..
X
स्वर्गीय सुरांची गुंफण करून प्रेक्षकांना मोहित करणाऱ्या राहुल देशपांडेंना आता त्यांची लेक गायनाचे धडे देतेय... ‘बाबा मी सुंदर गातेय, तु पण मस्त गातोय, पण तुला लोक हसतील’ असं निरागसपणे सांगतेय. असं नको करू.. मग राहुल यांनाही तीचं म्हणणं ऐकावं लागलंच... राहुल देशपांडेंना दटावणाऱ्या त्यांच्या लेकीचा हा सुंदर व्डिडीओ एकदा पाहाच...
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/2883370298409532/
शास्त्रीय संगीतातलं एक सुवर्ण पान म्हणजे वसंतराव देशपांडे. आपल्या गायकीनं अनेकांना मोहीत करणारे आणि प्रस्थापित घरान्यांचं आव्हान पेलून त्यांच्या ओठी आपलं नाव अदबीने उमटवणारं असं हे घराणं.. त्यांच्याच सुरांचा हा वारसा नातू राहुल देशपांडे यांनीही मोठा अभिमानाने आणि सुंदर गायकीने पेललाय. आपल्या वडीलांसोबत गाण्याचे बोल गाणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या लेकीकडे पाहून देशपांडे घराण्याचा हा वारसा असाच पुढे अविरत चालणार यात काही शंका नाही.