Home > व्हिडीओ > सांगलीला पुराचा धोका, पुन्हा घर सोडण्याची वेळ

सांगलीला पुराचा धोका, पुन्हा घर सोडण्याची वेळ

सांगलीला पुराचा धोका, पुन्हा घर सोडण्याची वेळ
X

पावसाची संततधार आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या पुन्हा पात्राबाहेर पडल्या आहेत. सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर पोहोचताच नदीकाठच्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू झाले आहे.

आपले नुकसान टाळण्यासाठी सांगलीतील सुर्यवंशी प्लॉट परिसरातील कुटुंब सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाली आहेत. “आम्हाला साहेबलोक सांगुन गेल्यात पाणी येणार हाय तुमचं तुमी सावधान ऱ्हावा. तेव्हा सगळ रिकामं करुन आमचा आम्ही पसारा घेऊन चाललोय. प्रत्येकवर्षी पाणी येतय इथं, त्यामुळं आता आम्ही वाट पाहाणार नाही मदतीची. आम्ही आमच्या आमच्या खोल्या बघून चाललोय इथून.” अशी प्रतिक्रीया एका महिलेने दिली आहे.

दरम्यान, या नागरिकांना स्थलांतरासाठी महापालिकेचे कर्मचारी मदत करीत असून नागरिकांनी पाणी वाढण्याची वाट न बघता वेळीच बाहेर पडावे असे आवाहन मनपा आयुक्तांनी केलं आहे.

https://youtu.be/zxXxXJhtIaE

Updated : 17 Aug 2020 8:25 AM GMT
Next Story
Share it
Top