Top
Home > व्हिडीओ > 9 वी आणि 11 वी च्या परीक्षांसह दहावीचा भूगोलाचा पेपरही रद्द - वर्षा गायकवाड

9 वी आणि 11 वी च्या परीक्षांसह दहावीचा भूगोलाचा पेपरही रद्द - वर्षा गायकवाड

9 वी आणि 11 वी च्या परीक्षांसह दहावीचा भूगोलाचा पेपरही रद्द - वर्षा गायकवाड
X

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला असून भूगोल आणि कार्यशिक्षण या विषयांचे पेपर रद्द करण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. आता मात्र हा लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण खात्याने मोठा निर्णय घेतला आहे.

वर्षा गायकवाड यांनी व्हिडीओद्वारे या निर्णयांची घोषणा केली. त्या म्हणाल्या की, “राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्यासाठी पहिल्या सत्राचा आधार घेतला जाणार आहे. पहिल्या सत्रात झालेल्या चाचण्या आणि प्रात्याक्षिके व अंतर्गत मूल्यमापन करून या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल. याशिवाय इयत्ता दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आले आहे.”

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/224688778590714/?t=1

Updated : 12 April 2020 2:07 PM GMT
Next Story
Share it
Top