Home > व्हिडीओ > 'गंदी बात' फेमस अभिनेत्री, गहना वशिष्टची प्रकृती गंभीर

'गंदी बात' फेमस अभिनेत्री, गहना वशिष्टची प्रकृती गंभीर

गंदी बात फेमस अभिनेत्री, गहना वशिष्टची प्रकृती गंभीर
X

'गंदी बात' या वेबसीरिजची लीड अभिनेत्री गहना वशिष्टची प्रकृती गंभीर असल्यामुळे सकाळी मलाड येथील रुग्णालयात तिला भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे तिच्यावर ICU मध्ये उपचार सुरु आहेत.

सतत ४८ तास शुटिंग केल्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली, गहनाला व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले आहे. गहनाला डायबिटीस असल्यामुळे बीपी कमी होऊन ती सेटवर कोसळली. अशी प्राथमिक माहिती समजते.

डॉक्टर प्रणव काबरा यांच्या म्हण्यानुसार गहनाची प्रकृती ईतकी गंभीर होती की जर अजून काही मिनिटं उशीर झालं असतं तर तिला मृत घोषित करण्यात आले असते. अजूनही प्रकृती गंभीर असल्यामुळे अजूनही रिकव्हर होण्यासाठी १२ ते २४ तास लागतील असं डॉक्टर बोलले.

Updated : 22 Nov 2019 2:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top