Home > व्हिडीओ > 'ढिशूम ढिशूम धाय धाय..' पुण्यात नर्स आणि बाऊंसरमध्ये राडा

'ढिशूम ढिशूम धाय धाय..' पुण्यात नर्स आणि बाऊंसरमध्ये राडा

‘ढिशूम ढिशूम धाय धाय..’ पुण्यात नर्स आणि बाऊंसरमध्ये राडा.. आठ महिला बाऊंसर निलंबीत

ढिशूम ढिशूम धाय धाय.. पुण्यात नर्स आणि बाऊंसरमध्ये राडा
X

शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटर येथे रखडलेला पगार घेण्यासाठी आलेल्या परिचारीका आणि महिला बाउंसरमध्ये गुरुवारी (ता.२४) तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोचलेले हे प्रकरण सामोपचाराने मिटले.

पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयात पगार घेण्यासाठी आलेल्या नर्सेस व ब्रदर्स यांना येथील बाऊन्सरकडून मारहाण झाली होती. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. मेट ब्रो या खासगी एजन्सीकडे जम्बो कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कंत्राटी बाऊन्सरच्या गुंडगिरीमुळे पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा एकदा बदनाम झालं आहे. नर्सेस आणि बाऊन्सरच्या वादात जम्बो कोविड रुग्णालयाच्या गेटवरच मारहाण सुरू झाली होती. अखेर व्यवस्थापनाने यावर कारवाई करीत त्या आठही बाऊन्सर यांना निलंबित केलं आहे.

जंबो कोविड सेंटर येथे काम करणाऱ्या नर्सेस आणि वॉर्ड बॉईजचे पगार रखडलेले आहेत. ते गुरुवारी २४ तारखेला दिले जात होते. त्याच दरम्यान तिथल्या बाऊंसर्स आणि हाऊस कीपिंग कर्मचाऱ्यांसोबत त्यांची वादावादी झाली. यातून दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना भिडले. घटनेनंतर दोन्हीकडील कर्मचारी तक्रार देण्यासाठी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गेले.


Updated : 25 Dec 2020 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top