Home > व्हिडीओ > महिलांच्या हक्कासाठी राजीनामा देणारा नेता: डॉ. निलम गोऱ्हे

महिलांच्या हक्कासाठी राजीनामा देणारा नेता: डॉ. निलम गोऱ्हे

घटनेचे शिल्पकार आणि मानवधिकाराचे थोर पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजापूरते मर्यादित नसून सगळ्या समाजाचे ते नेते आहेत.

महिलांच्या हक्कासाठी राजीनामा देणारा नेता: डॉ. निलम गोऱ्हे
X

घटनेचे शिल्पकार आणि मानवधिकाराचे थोर पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजापूरते मर्यादित नसून सगळ्या समाजाचे ते नेते आहेत. समाजामध्ये जातीयतेच्या पलिकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना एकत्र जोडणारा दुवा म्हणून डॉ. बाबासाहेबाचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटना तयार करत असताना विरोधाची तमा न बाळगता, हिंदू कोड बील देऊन स्त्रियांबद्दच्या कायद्यात सुसूत्रता करण्याचे काम बाबासाहेबांनी केलं. याला सरंजामी लोकांचा विरोध होता. त्यामुळे बाबासाहेबांना राजीनामा देण्यास भाग पाडले. परंतू डॉ. आंबेडकरांनी ज्या पद्धतीने राज्यघटना पाहिजे होती त्यात कुठलीही तडजोड केली नाही.

भारतात स्त्रियांसाठी हिंदू कोड बिलाबरोबरचं मतदानाचा हक्क ही स्त्रियांना मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांचा मोलाचा वाटा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्याप्रमाणात सार्वजनिकरित्या साजरी करता येत नसली तरी आपण सर्वांनी त्यांचे विचार आचरणात आणून सातत्याने काम करत राहिलं पाहिजे हीच डॉ. बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. असं मत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

Updated : 13 April 2021 10:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top