Home > व्हिडीओ > Youth Day Special : मिस बॉडीगार्ड दिपाली परब...

Youth Day Special : मिस बॉडीगार्ड दिपाली परब...

Youth Day Special : मिस बॉडीगार्ड दिपाली परब...
X

आपल्या मनातील भिती आधी घालवा असे आवाहन दिपाली परब करत आहेत. दिपाली परब या पहिल्या महिल्या बाउन्सर ग्रुपच्या संस्थापिका आहेत. वाढत चाललेल्या बलात्काराच्या घडनेवर बोलतांना त्या सांगतात, स्त्रीया स्वतःला कमजोर समजतात हा समज आधी डोक्यातुन काढायला हवा.

आमच्या महिला या रात्री दोनला. स्वतःच काम संपवुन घरी परतात. त्यांना भिती वाटत नाही. महिलांना स्वतःवर विश्र्वास करायला मी शिकवते. पार्लरचा व्यवसाय सोडून बाउन्सरसाठी रणरागिणी गटाची त्यांना स्थापना केली. हजारो महिलांना त्या प्रशिक्षण तर देतातच त्या बरोबर स्वतःच्या पायावरही उभे राहायला शिकवतात. त्यांचा हा प्रवास नेत्रदिपक वाटत असला तरी तसा तो सोपा नव्हता.

समाजातुनही त्यांना विरोध झालाच मात्र आपल्या मतावर ठाम निश्चयामुळे त्यांनी पहिल्या महिला बाउन्सर गटाची स्थापना केली. या द्वारे त्या केवळ VIP महिलांचीच सुरक्षा करतात अस नाहीतर रस्त्यावर मनोविकार ग्रस्त त्याबरोबरच इतर स्त्रीयांनाही त्या सुरक्षा देतात. दिपाली परब या आहेत आपल्या मॅक्सवुमन.

Updated : 6 Dec 2019 7:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top