… आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या ‘प्रियांका चोप्रा जिंदाबाद’च्या घोषणा
Max Woman | 2 Dec 2019 3:12 PM IST
X
X
काँग्रेस (Congress) नेत्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका सभेत ‘प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) जिंदाबाद’ म्हणायच्या ऐवजी ‘प्रियांका चोप्रा जिंदाबाद’ म्हणल्याने या नेत्याचे चांगलेच हसू झाले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक होत १४ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये ‘जनआक्रोश रॅली’ काढणार आहे. त्याआधी दिल्लीत वातावरण तयार करण्यासाठी कॉर्नर सभांचं आयोजन केलं जातंय.
अशाच एका सभेत घोषणाबाजी सुरू होती. काँग्रेस पार्टी जिंदाबाद, सोनिया गांधी(Sonia Gandhi) जिंदाबाद, राहुल गांधी (Rahul Gandhi) जिंदाबाद अशा घोषणा दिल्यानंतर दिल्लीतील माजी आमदार सुरेंद्र कुमार यांनी प्रियांका गांधी यांच्या ऐवजी प्रियांका चोप्रा असं नाव घेतलं. घोषणांच्या ओघात खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी लगेचच जिंदाबादच्या घोषणा दिल्या. आपली चूक लक्षात आल्यावर या कुमार यांनी माफी मागतली आणि पुन्हा प्रियांका गांधी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
पाहा व्हिडीओ
Updated : 2 Dec 2019 3:12 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire