Home > व्हिडीओ > #ThanksDrAmbedkar : "रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला हैं |

#ThanksDrAmbedkar : "रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला हैं |

"तुम्ही-आम्ही साऱ्यांनी केला पाहिजे आज जयभीम... कारण जयभीम म्हणजे आमचा श्वास, जयभीम म्हणजे उच्चश्वास... जयभीम म्हणजे आमचा मान...जयभीम म्हणजे भारताचे सर्वांगसुंदर संविधान"

#ThanksDrAmbedkar : रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला हैं |
X

"अरे तुझ्या कृपेने जगणे तर सोपे झाले, टक लावूनी सुर्याला बघने तर सोपे झाले

तू प्रकाश पेरून गेला डोळ्यात आंधळ्या आमच्या, गुंत्यातून अंधाराच्या निघणे तर सोप्पे झाले."

या गजलाच्या ओळीतून विद्या शिर्के-बाळदकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. "तुम्ही-आम्ही साऱ्यांनी केला पाहिजे आज जयभीम... कारण जयभीम म्हणजे आमचा श्वास, जयभीम म्हणजे उच्चश्वास... जयभीम म्हणजे आमचा मान...जयभीम म्हणजे भारताचे सर्वांगसुंदर संविधान आणि म्हणून सर्व भारतीयांनी केला पाहिजे आज जयभीम"

विद्या सांगतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे कैवारी नसून समाजातील सर्व घटकांचे कैवारी आहे. त्यांनी आम्हा महिलांसाठी हिंदू कोड बिल आणलं. आमच्या जगण्याला माणूसपणाचा अर्थ दिला. आज या महामानवाची १३० वी जयंती जगभरात साजरी केली जात आहे.

"रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है

ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है

और को जो मिला है वो मुकद्दर से मिला है

हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है"

अशा आपल्या खास शैलीत विद्य शिर्के- बाळदकर यांनी डॉ. बाबासाहेबांना आदराजंली वाहिली आहे.

Updated : 14 April 2021 8:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top