Home > Uncategorized > कुठे आहे सत्तेतला महिलांचा वाटा ?

कुठे आहे सत्तेतला महिलांचा वाटा ?

कुठे आहे सत्तेतला महिलांचा वाटा ?
X

मुळात भारतामध्ये पुरुषप्रधान सत्ता आहे. याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव समाजात दिसून येतो. तो राजकारणात देखील दिसून येतो. आमदारांनी ईश्वर साक्ष शपथ घेतली तर काही आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची साक्ष घेवून आमदाराकीची शपथ घेतली. शपथ घेताना या नेत्यानीं आईचं नाव घेतलं आहे पण प्रतयक्ष या मंत्रीमडंलात महिलांना हे सरकार किती स्थान देईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाविकासआघाडीच्या ७ मंत्र्यामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही. शपथ घेतानां आईच्या नावाचा उल्लेख केला पण महिलांसाठी हे सरकार किती स्थान देईल हे पहाण्यायोग्य आहे.

रोहित पवार यांनी “मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार शपथ घेतो की…” अशी सुरुवात रोहित यांनी आमदारकीची शपथ घेताना केली. रोहित हे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याचे नातू आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये रोहित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निटकटवर्तीय राम शिंदे यांचा पराभव करत विधानसभेची निवडणूक जिंकली. ४३ हजार ३४७ मताधिक्याने रोहित निवडून आले आहेत.

यानंतर महाविकासआघाडीच्या या दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतानां आईच्या नावाचा उल्लेख केला. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी शपथ घेतानां आपल्या आईच्या नावाचा देखिल उल्लेख केला. मी जयंत कुसुम राजाराम पाटील...' असं म्हणत त्यांनी शपथेची सुरुवात केली. त्यांनी आपल्या आईबदद्ल एक भावूक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी “महाराष्ट्राचा मंत्री म्हणून दिलेली जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो. यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप जास्त आनंद झाला असता. आई जिथे कुठे असेल तिथून मला पाहून नक्कीच आशीर्वाद देत असेल.” असं ट्विट केलं आहे.

काँग्रेसचे विधर्भातील जेष्ठ नेते डॉ. नितीन राऊत हे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. डॉ. नितीन राऊत यांच्या नावाचा समावेश होता. डॉ. नितीन राऊत यांनी देखील आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केला. मी नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत...शपथ घेतो ... ' असं म्हणत त्यांनी शपथेची सुरुवात केली. नितीन राऊत हे विदर्भातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ते महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर 1999-2004, 2004-2009, 2009-2014 महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. 1999, 2004 आणि 2009 मधील विधानसभा निवडणुकीत ते नागपूर उत्तर मतदारसंघातून आमदारपदी निवडून गेले होते.

महिलांना मानाचे स्थान शपथविधीच्या कार्यक्रमात दिसले मात्र प्रत्यक्ष सत्ता स्थापनेत दिसले नाही कारण एकही महिलेचा शपथविधी झाला नाही. याता या सत्तेत महिलांना किती स्थान मिळणार हे बघण्यासारखे असेल कि महिलांना सन्मान केवळ शपथविधीपुरताच मर्यादीत राहिल हे मंत्रीमंडळ च्या स्थापने दरम्यान लक्षात येईल.

Updated : 30 Nov 2019 11:39 AM GMT
Next Story
Share it
Top