Home > Uncategorized > घरकाम करणाऱ्या गीता काळे यांचे व्हिजीटिंग कार्ड

घरकाम करणाऱ्या गीता काळे यांचे व्हिजीटिंग कार्ड

घरकाम करणाऱ्या गीता काळे यांचे व्हिजीटिंग कार्ड
X

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी अनेक व्यवसाय करणारे व्यक्ती व्हिजीटिंग कार्ड छापतात. सध्या एक खास बिझनेस कार्ड सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत आहे. फरक फक्त इतकाच की हे कार्ड घरकाम करणाऱ्या गीता काळे यांच आहे.

गीता काळे या मुळच्या कर्नाटकमधील गुलबर्ग्याच्या आहेत पुण्यात काम मिळवण्यासाठी संपर्क कसा वाढवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळं त्यांनी हा प्रयोग केला. गीता काळे ही घरकाम करणारी बाई कार्ड प्रिंट करून घेते म्हटल्यावर... सर्वच व्हॉट् अॅप गृपवर कौतुक सुरु झालं तर, काही लोकांच्या भुवया उंचावल्या. काय बाईचा थाट? असेही एक्सप्रेशन्स होतेच. महिलांच्या ग्रुपवर तर अनेक भूमिका धडाधड पोस्ट झाल्या. काही लोकांनी तर चक्क त्या नंबर वर फोन करून त्यांना सतावून सोडले आहे.

आज त्यांनी केलेल्या या प्रयोगाचा त्यांनाच त्रास होत आहे ही एक लज्जास्पद गोष्ट आहे. एखाद्या सामान्य माणसाने केलेलं मॉडर्न प्रयोगाची खिल्ली न उडवता घर चालवण्यासाठी कष्ट करणाऱ्या या स्त्रीला सर्व स्तरातून पाठिंब्याची गरज आहे.

Updated : 7 Nov 2019 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top