Home > Uncategorized > तृप्ती देसाईंनी केली बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार दाखल

तृप्ती देसाईंनी केली बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार दाखल

तृप्ती देसाईंनी केली बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार दाखल
X

भूमाता बिग्रेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी फेसबुक वर पोस्ट केली. या पोस्ट मध्ये त्यांनी अडचणीत असणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्याची बाजू मांडली आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्ट मुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे नेते बच्चू कडू हे विदर्भातील अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या विरोधात आंदोलन करतील का? अशी फेसबुक पोस्ट तृप्ती देसाई यांनी केली होती. यामुळे बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी तृप्ती देसाईंच्या विरोधात अपरिहार्य शब्दात टीका केली.

शिवाय बच्चु कडूंनी तुम्ही आम्हाला शहानपणा शिकवायचा नाही. असा उलट सल्ला तृप्ती देसाई यांना दिला. नाहीतर याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी देखील त्यांनी तृप्ती देसाई यांना फोनवर दिली. एका महिलेशी कसं बोलावं याचे भान बच्चू कडू यांना राहीलेलं नाही म्हणून तृप्ती देसाई यांनी कडूंच्या विरोधात पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

यासंदर्भात बोलताना बच्चू कडू यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने म्हटल की, “बच्चू कडू यांना तृप्ती देसाई यांनी स्वत:हून फोन केला होता. देसाई या पब्लिसीटीसाठी हे सर्व करत आहेत.”

पहा व्हिडीओ…

Updated : 2 Nov 2019 3:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top