Home > Uncategorized > राजकारणातील महिलांना खालचा दर्जा देणाऱ्या नराधमांचे विचार

राजकारणातील महिलांना खालचा दर्जा देणाऱ्या नराधमांचे विचार

राजकारणातील महिलांना खालचा दर्जा देणाऱ्या नराधमांचे विचार
X

समाजकारण, राजकारण करणारी महिला म्हणजे फालतु आहे. असा समज काही स्वत:ला दुधातला धुतलेला तांदळासारखे आणि मी नाही त्यातली कडी लाव आतली ही म्हणी लागु होणारे माझे भाऊ महिलेवर टिका टिप्पणी करणारे हिजडे मी रोज पहात आहे....

महिला राजकारणात उतरली म्हणजे ती खाऊ खुजाव बत्ती बुजाव अशी असते हे मत त्या फालतु भावाचं आहे जे स्वत: समाज कारणात राजकारणात महिलेला उपभोगासाठी आजमवतात आणि तिच्या मजबुरीचा फायदा घेतात. आणि तीला असं मजबुर करतात की, ती फालतुगिरी साठी हो म्हाणालीच पाहिजे...

आणि जेव्हा ‘ती’ फेमस होऊ लागते आणि ती तिच्या प्रसिद्धीचा फायदा जनतेसाठी करते, गोर गरिबांसाठी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी व महिलेच्या मदती साठी करते तेव्हा ‘ती’ त्या फालतु मर्द म्हणुन घेणाऱ्या हिजड्यांना खटकु लागत.

मग तुम्ही काय करता ती महिला कितीही खरं सांगत असेल तेव्हा तुम्ही आणि तुमचे फेक आयडी आणि तुमचे अंध फक्त तीला ट्रोल करता तीच्या बद्दल अपशब्दांचा वापर करता...

या शब्दाचा वापर करता की, हिला खुप खाज आहे. हिची खुप फडफड करते, हिला थंड करतो. ही धंदा करणारी, ही सेटेलंमेट करणारी, हिने किती खाल्ले, हिने ह्याव केलं अन् त्याव केलं... अरे भाडखाऊनो तुम्ही कीती चांगले आहात आधी पहा तुमच्या बुडा खालचा अंधार पहा मग दुसऱ्याच्या बुडाखालचा अंधार पहा...

अरे एखाद्या महिलेला तुम्ही टारगेट करुन त्रास देता. हे कितपत योग्य आहे??? बर माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या??? जर महिला एखादा पक्ष सोडुन दुसऱ्या पक्षात जाते तेव्हा तुम्ही तीला शरीराच्या खालच्या बाजु वरुन शिव्या गाळी करता??? खालच्या पातळीवर जाऊन कंमेट करता हे कितपत योग्य आहे???

ती महिला स्वत: आतल्या आत खचते. कारण सोशल मीडियावर असले कमेंट सहन करता नाही, पण त्या महिला खुप खंभीर आहेत. तुमचे ह्या शब्दांचा परीणाम जरी झाला तरी त्या परत भक्कमपणे उभ्या राहतात...

मग पुरुष जेव्हा पक्ष बदलतो तेव्हा बरं त्याला अपशब्दांचा वापर करत नाहीत??? कारण तो पुरुष आहे तुमच्या वाईट कंमेटला तो तुमची आई बहिण एक करेल म्हणुन तुम्ही पुरुषाला एकही वाईट शब्द बोलणार नाही... कारण पुरुष प्रधान युग चालु आहे...

वाह रे मर्दानो महिलेचा अपमान करुन तीला त्रास देऊन तीला अपशब्दांचा वापर करुन तीला ट्रोल करु पाहाता... पहा आम्ही महीला एवढ्या कमजोर लाचार नाही तुमच्या टिकाटीप्पणी वर घाबरुन जाऊ... करा जे करायचयं ते करा आम्ही तुमच्या सारख्याला सडेतोड उत्तर द्यायला भक्कम आहोत...

मला कदाचित खुप वाईट कंमेट येतीलही तरी मी पर्वा करत नाही...

- सुरेखा विजय माने

Updated : 4 Nov 2019 2:56 PM GMT
Next Story
Share it
Top