Top
Home > Uncategorized > ‘या’ दंगल गर्लने ठोकला कुस्तीला राम-राम

‘या’ दंगल गर्लने ठोकला कुस्तीला राम-राम

‘या’ दंगल गर्लने ठोकला कुस्तीला राम-राम
X

महावीर सिंह फोगाट हे कुस्तीमधील गाजलेले नाव सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या संपुर्ण कुटुंबामध्ये हा कुस्तीचा वारसा जपला गेला आहे. दंगल गर्ल गिता आणि बबिता फोगाट यांची बहीण रितू फोगाट आता कुस्ती सोडण्याचा निर्णय घेऊन मिक्स मार्शल आर्ट्स (MMA) मध्ये आपलं नशीब आजमवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या रितूच्या या निर्णयाने भारतीय कुस्ती क्षेत्राला धक्का बसणार आहे. पण, MMA च्या जागतिक जेतेपदातून ते नुकसान भरून काढण्याचा निर्धार रितूनं बोलून दाखवला आहे. सिंगापूर येथे ती MMA मध्ये पदार्पणाचा सामना खेळणार आहे.

“भारतात असताना टीव्हीवर मिक्स मार्शल आर्ट्सचे अनेक सामने पाहिले होते. त्यामुळे आपणही त्यात कारकीर्द करावी असे वाटत होते. कुस्ती आणि मिक्स मार्शल आर्ट्सचे डावपेच यात फरक आहे. खेळ कोणताही असो सरावाला कधीच घाबरले नाही. आता मी मिक्स मार्शल आर्ट्सचा कसून सराव केला आहे.'' असं रितू फोगाटने म्हटंल आहे.

Updated : 7 Nov 2019 10:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top