Home > Uncategorized > …अशी घडली डिजायनर ऑफ द इयर 2019

…अशी घडली डिजायनर ऑफ द इयर 2019

…अशी घडली डिजायनर ऑफ द इयर 2019
X

राजस्थानमध्यील बाडमेर येथे राहणाऱ्या डिजायनर ऑफ द इयर 2019, रूमा देवींचा खडतर जिवन प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. आठवी शिकलेल्या रूमा देवी या सध्या च्या परिस्थितीत 11 हजारपेक्षा अधिक महिलांना रोजगार देऊन स्वत:च्या पायावर उभा राहायला मदत करत आहेत.

वयाच्या 17 व्या वर्षी रूमा देवी यांचं लग्न झालं. पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्या पुर्णपणे खचल्या. पण असंच शांत न बसता काही तरी करून दाखवण्याचं धाडस त्यांनी केलं आणि त्यांच्यात असलेल्या भरतकामाच्या कलेला वाव दिला. त्यांनी सुरुवातीला दोन-तीन महिलांना हाताशी घेऊन भरतकाम करण्यास सुरुवात केली. काही कालांतराने रुमादेवींचा व्यवसाय वाढत गेला आणि आता त्या पॅरीसला जाण्याच्या तयारीत आहेत. ‘नारी शक्ती’ आणि ‘डिजायनर ऑफ द इयर’ अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलेल्या रुमा देवी देशातील कोट्यावधी महिलांसाठी प्रेरणादायी आहेत.

Updated : 11 Sep 2019 3:24 PM GMT
Next Story
Share it
Top