Home > Uncategorized > धक्कादायक... शौचालयात चिमुकलीचा बलात्कार करुन हत्या

धक्कादायक... शौचालयात चिमुकलीचा बलात्कार करुन हत्या

धक्कादायक... शौचालयात चिमुकलीचा बलात्कार करुन हत्या
X

बलात्कार, अत्याचार अशा घटनांच्या बातम्या ऐकण्यास काही नवीन नाही... सातत्याने होत असलेल्या या अत्याचारांचे लोण आता समाजात अधिक प्रमाणात पसरत चाललं आहे. जुहू परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी ३५ वर्षीय देवेंद्र वड्डी याला अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून संबंधित मुलगी बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असताना आज ती एका सार्वजनिक शौचालयात मृतावस्थेत आढळली. तिच्यावर बलात्कार झाल्याचं वैद्यकीय तपासणीनंतर उघड झालं आहे. देवेंद्र वड्डी यानं हे कृत्य केल्याचं चौकशीअंती समोर आलं. वड्डी हा याच परिसरात राहणारा असून त्याच्यावर याआधीही काही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली असली तरी या भागात प्रचंड तणाव आहे. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.

Updated : 6 April 2019 4:01 PM IST
Next Story
Share it
Top