Home > Uncategorized > आपल्याच नेत्यांच्या विरोधात उभ्या राहणार सुप्रिया सुळे

आपल्याच नेत्यांच्या विरोधात उभ्या राहणार सुप्रिया सुळे

आपल्याच नेत्यांच्या विरोधात उभ्या राहणार सुप्रिया सुळे
X

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना आवाहन केले की, “महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर राष्ट्रवादीच्या हातात सत्ता द्या. सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण हे तोडपाणीचं झालं आहे. कोणाला आपला कारखाना वाचवायचा आहे, कोणाला घोटाळ्यातून बाहेर पडायचं आहे. तर कोणाला सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवायचे आहेत. याशिवाय ईडी तसेच सीबीआय यांच्या तपासापासून बाजू काढण्यासाठी अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.” अशी टिका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

“तसेच निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार कसा वाईट आहे हे सांगून मत मागण्यापेक्षा आपल्या नेत्यांचे कर्तुत्व सांगुन मतदान मागावं” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुप्रिया सुळे एकेकाळी स्नेही असलेल्या आणि आपल्या पक्षातून भाजपात पक्षांतरीत झालेल्या नेत्यांच्या विरोधात उभ्या राहणार हे नक्की...

Updated : 10 Sep 2019 9:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top