Home > Uncategorized > सुळेंना डेंग्यू, प्रचारातून गायब

सुळेंना डेंग्यू, प्रचारातून गायब

सुळेंना डेंग्यू, प्रचारातून गायब
X

विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचाराला लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे देखील दौरे सुरु आहेत. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वात सक्रिय असणाऱ्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे सध्या प्रचारातून गायब आहेत. सुप्रिया सुळे प्रचारात का नाही? अशी चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात सुरु असताना सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत त्यांना डेंग्यूची लागण झाल्या असल्याचं सांगत आपण प्रचारासाठी घराबाहेर पडू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंना डेंग्यू झाल्याने त्यांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

“ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतू डासांचा उच्छाद अखेर भोवला! मला डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.”

यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुप्रिया सुळे यांचा चेहरा दिसण्याची चिन्ह फार कमी दिसून येत आहेत.

Updated : 25 Sep 2019 4:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top