Home > Uncategorized > शेतकऱ्यांसाठी सक्षणा सलगर यांचा खास उपक्रम

शेतकऱ्यांसाठी सक्षणा सलगर यांचा खास उपक्रम

शेतकऱ्यांसाठी सक्षणा सलगर यांचा खास उपक्रम
X

राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. अतिवृष्टीमुळे साठलेल्या पाण्याला मार्गी लावण्यासाठी सलगर यांनी आपल्या मतदार संघातील टाकळी बींबी गावात एक उपक्रम राबवला आहे.

नदीकाठच्या शेतांचे अती नुकसान होऊ नये यासाठी सक्षणा सलगर यांनी आपल्या मतदारसंघातील टाकळी बींबी येथे पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साठवून ठेवण्यासाठी गेल्या ४ ते ५ महिन्यापासून नदीचे खोलीकरण करण्याचा उपक्रम राबवत आहेत.

भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदच्या माध्यमातून अडीच किलोमीटर पर्यंत नदी खोलीकरणाचं काम सुरु केलं होत. या उपक्रमाचा जवळ जवळ ५०० हेक्टर क्षेत्राला फायदा झाला आहे. पिण्याच्या पाण्याचेही प्रश्न सुटले आहेत. या निमित्ताने त्यांनी स्थानिक समाजसेवक तसेच गावकऱ्यांसह मिळून जलपूजनाचा कार्यक्रम पार पाडला.

एकीकडे सत्ता स्थापनेवरून दोन पक्षात राजकारण पेटलं आहे. तर दुसरीकडे सलगर यांच्यासारख्या नेत्या फक्त निवडणूकीपुरतं काम न करता इतर वेळी देखील तत्परने काम करतात. त्यांच्या या कामाचा सर्वांनीच आदर्श घेतला पाहिजे.

Updated : 9 Nov 2019 11:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top