Home > Uncategorized > कधीही या... घाबरू नका – स्नेहल डोके पाटीलची अनोखी साद

कधीही या... घाबरू नका – स्नेहल डोके पाटीलची अनोखी साद

कधीही या... घाबरू नका – स्नेहल डोके पाटीलची अनोखी साद
X

महिलांवरील अत्याचाराच्या बातम्यांनी वृत्तपत्र भरलेली असताना, टीव्ही वाहिन्यांवर डिबेट झडत असताना स्नेहल डोके पाटील ने मात्र आपली वेगळीच वाट चोखाळलीय. केवळ चिंता करत बसण्यात अर्थ नाही. प्रत्यक्ष कृती केली पाहिजे यावर विश्वास असणाऱ्या स्नेहल ने आपला फोन नंबरच फेसबुक वर टाकलाय.

रात्री – अपरात्री प्रवासा दरम्यान काही अडचण वाटत असेल, आहात त्या परिसरात सेफ म्हणजे सुरक्षित वाटत नसेल तर थेट फोन करा, जिथे असाल तिथे मी स्वतः किंवा माझे मित्र-मैत्रिण हजर राहून तुम्हाला मदत करतील अशी पोस्ट स्नेहल ने केली आहे. स्नेहल ने या आधी सांगली – कोल्हापूर येथील महापुराच्या वेळेसही प्रत्यक्ष मैदानात उतरून लोकांना मदत केली होती.

Updated : 8 Dec 2019 12:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top