Home > Uncategorized > ‘त्या’ पोलीस अधिकारी महिलेचा व्हिडीओ व्हायरल

‘त्या’ पोलीस अधिकारी महिलेचा व्हिडीओ व्हायरल

‘त्या’ पोलीस अधिकारी महिलेचा व्हिडीओ व्हायरल
X

मध्य प्रदेशमधील मगरोन पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी श्रद्धा शुक्ला यांच्याविषयी सर्वत्र चर्चा सुरु आहे. नेहमीच आपल्या वाईट आणि जनतेला त्रासदायक वर्तवणुकीमुळे चर्चेत असणारे पोलीस आज श्रद्धा शुक्ला यांच्यामुळे अभिमानास्पद चर्चेचा विषय ठरले आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील ट्वीटरवरून त्यांच्या कामगिरीचा व्हिडीओ पोस्ट करून त्यांचे कौतूक केले आहे.

नेमकं असं काय घडलं की हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे. श्रद्धा शुक्ला या महिला पोलीस अधिकारी यांनी मगरोन बस स्टॅंड वर एका अज्ञात निराधार महिलेला कपडे आणि पायात चप्पल घातली. ही महिला बस स्टॅन्ड वर बरेच दिवस फिरत होती आणि तिची अवस्थाही फारच वाईट झाली होती. पुढे त्या महिलेची माहीती घेऊन तिच्या मुलाशी संपर्क साधला आणि मुलाचीही चौकशी करून त्या महिलेला स्वत:च्या गाडीने घरी सोडून आपली जबाबदारी पार पडली. या घटनेनंतर सर्वच स्तरांतुन श्रद्धा यांचा कौतूक केलं जात आहे.

शिवराज सिंह यांनी या अधिकारी महिलेबद्दल कौतुकास्पद ट्वीट करताना म्हटले आहे की, “दमोह जिल्ह्यातील मगरोन पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या श्रद्धा शुक्ला यांच्यासारख्या मुलींचा संपूर्ण मध्यप्रदेशला अभिमान आहे. मुली प्रत्येकाचे दुःख समजतात, त्या प्रत्येक घराचा प्रकाश असतात. यांच्यामुळेच संपूर्ण सृष्टी धन्य झाली आहे. मुलीच जगाला आनंदाने समृद्ध करणार आहेत. बेटी श्रद्धाला स्नेह, आशीर्वाद आणि शुभेच्छा!”

Updated : 28 Sep 2019 2:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top