रूपाली चाकणकर यांचे संजय काकडेंना प्रत्युत्तर
X
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी काकडेंना “तुमच्या भविष्यवाणीचे दुकान बंद करा” अशा शब्दात सुनावलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. याबाबत भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी त्यावर भाष्य केलं होतं. अजित पवार यांनी आपली बाजू स्पष्ट केल्यानंतर आता चाकणकर यांनी काकडेंना प्रत्युत्तर दिलंय.
अजित पवार हे राज ठाकरे यांच्याप्रमाणे स्वत:चा वेगळा पक्ष काढू शकतात असा तर्क संजय काकडे लावला होता. यावरुन रूपाली चाकणकर यांनी काकडेंचा समाचार घेतला. “संजय काकडे तुमच्या भविष्यवाणीचं दुकान आता बंद करा! खरंतर तुम्हा लोकांना इतका मोठा परिवार एकत्र आहे आणि तो एकविचाराने एकत्र राहतोय याचं दु:ख आहे. तुम्हाला पुण्यातील पुरपरिस्थिती दिसली नाही का? जरा तिकडे पण लक्ष द्या!” असा टोलाही त्यांनी काकडेंना लागवला.
संजय काकडे तुमच्या भविष्यवाणीचं दुकान आता बंद करा .
खरं तर तुम्हा लोकांना, इतका मोठा परिवार एकत्र आहे आणि तो एकविचाराने रहातो याचेच जास्त दुःख आहे.
पुण्यातील पुरपरिस्थतीत दिसले नाही कोठे??तिकडे पण बघा जरा..🙏🙏@ChDadaPatil @NCPspeaks@ThePuneMirrorhttps://t.co/7hmKe9EkkN
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 28, 2019