Home > Uncategorized > शेकऱ्यांसाठी नवनीत राणांचे आश्वासन

शेकऱ्यांसाठी नवनीत राणांचे आश्वासन

शेकऱ्यांसाठी नवनीत राणांचे आश्वासन
X

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या समोर दु:खाचा डोंगर खडा केला. अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं मातीमोल झाली. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार नवनीत राणा या काल अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि दर्यापूर या तालूक्यात पोहचल्या.

या दौऱ्यावर खासदार राणा यांच्यासह काही कृषी अधिकारी देखील सहभागी होते. राणा यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले. पिकांचा त्वरित पंचनामा करुन या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांना दिले.

Updated : 10 Nov 2019 11:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top