Home > Uncategorized > मैं विरासत की राजनिती को नहीं मानती – प्रिया दत्त

मैं विरासत की राजनिती को नहीं मानती – प्रिया दत्त

मैं विरासत की राजनिती को नहीं मानती – प्रिया दत्त
X

जरी पहिली निवडणुक मी माझ्या वडिलांच्या नावाने जिंकली असली तरी दुसरी निवडणुक मी माझ्या केलेल्या कामावर आणि जनतेतून निवडूण आली आहे. त्यामुळे काँग्रेस असो किंवा इतर कुणीही राजकारणात घराणेशाहीचा जो वारंवार आरोप होतो त्याला मी अजिबात नाही मानत. आमच्या मध्ये काहीतरी टँलेंट आहे म्हणून जनता आम्हाला पुन्हा संधी देते. त्यामुळे हे आरोप तथ्यहीन आहेत. असं खुद्द प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे. सुनील दत्त यांची मुलगी, संजय दत्तची बहीण, काँग्रेसची माजी खासदार अशी ओळख असलेली प्रिया दत्त उत्तर-मध्य मुंबईतून पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवतेय…तिच्या आजवरच्या प्रवासासंदर्भात आमची प्रतिनिधी प्रियंका आव्हाड यांनी केलेली खास बातचीत

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/398867137332139/

प्रिया दत्त यांनी या प्रश्नांची दिलेली सडेतोड..

1. आई, बहिण, पत्नी, मुलगी आणि लोकप्रतिनिधी या सगळ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडता?

आई, बहिण, पत्नी, मुलगी आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मात्र प्रत्येक महिलेत ती शक्ती असते. ज्यामुळे ती प्रत्येक काम चपळ आणि धाडसीपणाने करत असते.

माझ्या पहिल्या निवडणुकांवेळी मी गरोदर होते. त्यातच माझी सिझेरियन डेलिवरी झाली त्यावेळी माझ्यासाठी खूप कठीण वेळ होता कारण अवघ्या काही दिवसांच माझं बाळ असताना मला प्रचाराला जावं लागलं. घरातील जबाबदारी त्यातच निवडणुकांचा काळ हे सगळ पाहत असताना खूप अडचणी आल्या मात्र मी त्याचाही सामना केला. या सगळ्या अडचणींच्या काळात माझ्यासोबत माझे पति ओवेन यांचं मोठं योगदान आहे त्यांनी मला सतत पाठिंबा दिल्यामुळे मी माझ्या जबाबदाऱ्या नीटनेटक्यापणाने पार पाडल्या.

  1. सोशल मीडियावरील ट्रोल किंवा निवडणुकांत महिला उमेदवारांवर अश्लील भाषेचा वापर केला जातो. यावर तुमचं मत?

महिला म्हणून कार्यरत असताना अनेक समस्या असतातच मात्र त्यावर मात करत आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. सोशल मीडियावर ज्या पद्धतीने महिला उमेदवारांवर अश्लील भाषेचा वापर करण्यात येतो हे अत्यंत चुकीचं आहे. मी नेहमी याविरोधात आहे. तसेच महिलांना बाहेर जी सुरक्षा पुरवली जाते तीच सुरक्षा सोशल मीडियावरही दिली पाहिजे असं माझ मत आहे.

  1. मुलं कधी हट्ट करत नाही का आमच्या सोबत वेळ घालवं म्हणून?

हो... नेहमीच हट्ट असतो त्यांचा आणि माझ्या मुलांसाठी मी नेहमी वेळ काढत असते. कारण त्यांना मी या जगात आणलं आहे ती माझी जबाबदारी आहे त्यांच्यासोबत वेळ घालवते आम्ही शॉपिंग, सिनेमा बघायला जातो. तसेच माझ्या मुलांना चांगल वळण देऊन देशाचा जबाबदार नागरिक बनवण्याचा माझा प्रयत्न राहिल.

4. राजकारणात महिलांचे प्रमाण फार कमी आहे काय सागांल?

राजकारणात महिलांचे प्रमाण कमी असून आता बऱ्यापैकी महिला आता राजकारणात येऊ लागल्या आहे. युथ आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात राजकारणात यावं असं मत प्रिया दत्त यांनी मांडल असून यंदाच्या निडवणूकांमध्ये अनेक महिला सक्रीय होताना दिसतायेत असं देखील त्यांनी म्हटलंय. तसेच संसदेत सातत्याने महिला आरक्षणासंदर्भात मागणी केली जात आहे.

5.वेश्या महिलांसाठी तुम्ही लढा उभारला होता त्याबद्दल काय सांगाल?

वेश्या महिलांसाठी एक वेगळीच भावना आहे कारण त्या देखील या देशाच्या भाग आहे. ज्यावेळ मी रेडलाईटचा परिसर पाहते त्यावेळी मला फार दुःख होत की यांनाही यांचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी मी सातत्याने लढा देत राहिल. त्यांचे आरोग्य, शिक्षण आणखी अशा गोष्टी ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल. आणि त्या वेश्या महिला पोटापाण्यासाठी ही काम करत असतात. त्यामुळे ते काही वाईट करतायेत या मताची मी नाही. त्यांना सुविधा, अधिकार आणि हक्क मिळवून देणं ही मी माझी जबाबदारी समजते.

कोण आहेत प्रिया दत्त?

त्या काँग्रेसचे माजी खासदार व अभिनेते सुनील दत्त यांच्या कन्या आहेत. वडीलांकडून राजकारणाचा वारसा घेऊन त्या दोन वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. काँग्रेसने यंदाही त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. उत्तम जनसंपर्क असणा-या प्रिया दत्त या कायम समाजकारणात सक्रिय राहिलेल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सचिवपद त्यांनी सांभाळलेले आहे. मात्र या पदावरून हटवले गेल्यानंतर त्यांनी काही काळ सक्रिय राजकारणातून ब्रेक घेतला होता. हा काळ त्यांनी कुटुंबासाठी दिला. त्यांची आई नर्गिस दत्त यांच्या स्मरणार्थ असलेल्या नर्गिस दत्त फाऊंडेशनचेही त्या काम पाहातात. ती विश्रांती संपवून प्रिया दत्त या उत्तर-मध्य मुंबईतून 2019ची लोकसभा निवडणूक काँग्रेसतर्फे लढवत आहेत. यावेळीही पुन्हा एकदा त्यांची लढत पूनम महाजन यांच्याशी होणार आहे.

Updated : 17 April 2019 8:48 AM GMT
Next Story
Share it
Top