Home > Uncategorized > जुळ्या मुलींना सोडून दांपत्य रफूचक्कर

जुळ्या मुलींना सोडून दांपत्य रफूचक्कर

जुळ्या मुलींना सोडून दांपत्य रफूचक्कर
X

स्त्री हा प्रत्येक घरचा पाया असतो. ज्या घरावर स्त्रीची छाया नसते ते घर अधुरे असते. असं असतानाही आजही जगात असे काही बुरसटलेल्या विचारांचे लोक आहेत. जे आपल्या घराचा वारस हा फक्त मुलांमध्येच पाहतात आणि त्यांना मुलगी नकोशी असते.

अशीच एक घटना सध्या औरंगाबादमध्ये घडली आहे. अवघ्या २७ आठवड्यात एका आईने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. दोन्ही मुली असल्याने व त्यांची प्रकृती अशक्त आहे. यामुळे त्या दांपत्याने या जुळ्या मुलींना खाजगी रुग्णालयात दाखल केले आणि सध्या ते रफूचक्कर झाले आहेत.

रुग्णालयाने सध्या त्यांच्या आई-वडिलांची पोलिसात तक्रार केली आहे. पण त्यांचा ठावठीकाणा अजूनही मिळालेला नाही. आई वडील असूनही या मुलींची परिस्थिती अनाथ झाली आहे. तूर्तास रुग्णालयाने त्यांची सोय एका अनाथाश्रमात केली आहे. परंतु ही बाब अवघ्या मातापित्यांच्या प्रेमाला काळीमा फासणारी आहे.

Updated : 7 Nov 2019 11:49 AM GMT
Next Story
Share it
Top