Home > Uncategorized > आपण ह्यांना ओळखलंत का?

आपण ह्यांना ओळखलंत का?

आपण ह्यांना ओळखलंत का?
X

बॉलिवूडमधले सर्व कलाकार आपल्या वेगवेगळ्या लुकमुळे नेहमी चर्चेत असतात. एका व्हीडीओमुळे रातोरात स्टार झालेली राणू मंडलचादेखील एक नवा लूक समोर आला आहे. तिचे हे फोटो सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहेत. असं असलं तरी नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला तिला समोरं जावं लागतंय.

courtesy : social media

या फोटोंमध्ये तिने अति प्रमाणात मेकअप केल्याचं दिसून येत आहे. मुळात सावळी असलेली रानू या मेकअपमुळे पांढरी फटक दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ती नेटकऱ्यांच्या तावडीत सापडली आहे. तिच्या या लूकवर अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.

courtesy : social media

courtesy : social media

रेल्वेच्या डब्यात गाणी म्हणून आपला उदरनिर्वाह करणारी राणू मंडल ही सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार सिंगर झाली. आणि तेव्हापासून या ना त्या कारणामुळे ती चर्चेचा विषय ठरली. राणू मंडल हल्ली तिच्या गाण्यापेक्षा बदललेल्या वागणुकीमुळे जास्त चर्चेत असते.

लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गीत गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू अनेकांच्या नजरेत भरली, आणि तिला बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळाली. त्यातंनतर राणू ती प्रचंड लोकप्रिय झाली. मध्यंतरी एका फॅनने अंगाला हात लावल्याने राणू भडकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर राणू प्रसारमाध्यमांना अॅटीट्यूड दाखवत असल्याचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावरूनही तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

Updated : 17 Nov 2019 9:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top