Home > Uncategorized > महिलांसाठी नागपूर, बीड पोलिसांचे 'कवच'

महिलांसाठी नागपूर, बीड पोलिसांचे 'कवच'

महिलांसाठी नागपूर, बीड पोलिसांचे कवच
X

हैदराबाद तसेच उन्नाव बलात्कार प्रकरणानंतर महिलांमध्ये एकंदरीतच असुरक्षितेतची भावना आहे. अनेक महिलांना रात्री अपरात्रीही कामासाठी घराबाहेर पडावे लागते. अशावेळेस गाडी बंद पडली, रस्त्यात भीती वाटेल अशी परिस्थिती असेल तर काय करावे? असे प्रश्न महिलांना पडत असतो. मात्र आता नागपूर आणि बीड पोलीस महिलांच्या मदतीला धावुन आले आहेत.

बीडमध्ये 'कवच' या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार महिलांना असुरक्षित वाटत असेल किंवा घरी कसे जावे असा प्रश्न पडला असेल तर हेल्पलाईनवर फोन करताच तिला तीच्या घरी सोडण्याची व्यवस्था पोलिस करतील. अशीच व्यवस्था नागपूर पोलिसांनीही केलेली आहे. रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत ही सेवा दिली जाईल असे नागपुर पोलिसांनी सांगितले आहे.

Updated : 9 Dec 2019 8:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top